Our Activities

शालेय पुस्तकांची देवाणघेवाण अभियान

खरंतर पाठ्यपुस्तकातील धडे गिरवून आपण यशाच्या शिखरावर पोचतो. करिअरच्या वाटा निवडून वेगवेगळे क्षेत्र पादाक्रांत करतो. या पुस्तकांची किंमत अमूल्य असते, हा मौल्यवान ठेवा आडगळीत किंवा रद्दीत जाऊ नये यासाठी पाच वर्षांपूर्वी शालेय पुस्तकांची देवाणघेवाण हे अभियान पालक कमिटी ग्रुपच्या माध्यमातून संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हाती घेतले. पालकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या अभियानाला चळवळीच्या स्वरूप प्राप्त झाले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांनीच दिल्यामुळे पाठ्यपुस्तक अदान -प्रदान ही संकल्पना पालक प्रिय झाली. पनवेल सह राज्यातील अनेक भागांमध्ये अशाप्रकारे पुस्तक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे हे शक्य होऊ शकले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यमांकडून या चळवळीला ठळक प्रसिद्धी मिळाली. यासाठी पनवेल मधील सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार, पालक आणि सामाजिक संस्थांचे करावे तितके कौतुक कमी आहे. यामुळे लाखो रुपयांची बचत तर झालीच त्याचबरोबर हजारो पुस्तक शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताहेत ही अत्यंत आनंद व समाधानाची बाब आहे. पुन्हा एकदा सर्वांचे ऋणनिर्देश हे अभियान असेच पुढेही चालू राहावे यासाठी आपले सहकार्य तितकेच अनमोल राहील याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही संदेह नाही.