Our Activities
भव्य रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन
राजमाता पर्व जयंती उत्सव सोहळा २०२५ निमित्त यावर्षी प्रथमच भव्य रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा मुख्य विषय “महिला सबलीकरण” असून गड-किल्ले, थोर व्यक्तिमत्वे, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले आणि भारतमाता अशा प्रेरणादायी विषयांवर रांगोळी साकारण्यात आली. विविध रंगांच्या माध्यमातून रांगोळी सजवताना राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या संस्कारांनी आयुष्य सुंदर घडवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हा सोहळा राजिप शाळा, ग्रामपंचायत करंजाडे (पनवेल), पोलिस चौकी जवळ, सेक्टर ४, नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला.


























