Our Activities
संकल्प फाऊंडेशन, कामोठे, पनवेल यांनी दिला महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, थेट विद्यार्थ्यांपर्यंत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!
थेट बाधित भागात २४० कुटुंबीयांना मदत वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, टिफीन बॉक्स, कंपास पेटी, ड्रॉइंग किट, औषधी, खाऊसह २२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द केले.
महाड परिसरात देखील महापुराने सगळच उध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, वरंध या महाड तालुक्यातील पट्ट्यात देखील अनेकांना या महापुराचा भयंकर फटका बसला आहे. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना संकल्प फाऊंडेशन, कामोठे, पनवेल यांच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती म्हणून मदत करण्यात आली. भावे या गावातील जाधव वाडी, पोळ वाडी, आदिवासी वाडी, सुतार वाडी, बौद्ध वाडी, चौधरीवाडी, गुरव वाडी, वजरवाडी, पदाचा कोंड, कीये आदी तसेच ढालकाठी मधील गणेशनगर वसाहत भागात संकल्प फाउंडेशनचे मदत पोहोचले आहे.
*चिमुकले भारावले 😘
मदत देण्यासाठी बऱ्याच संस्था येतात परंतु त्या वर वर पाहून मदत करून निघून जातात. परंतु संकल्प फाउंडेशन, कामोठे, पनवेलच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे मॅडम यांनी आम्हा बालकांशी चर्चा करून, आमच्या समस्या लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्य, खाऊ, कपडे देऊन थेट भरघोस मदत केली. त्यांनी दिलेली भेट आमच्यासाठी अनमोल होती. त्यांचा विश्वास आम्ही सार्थकी लावू. गावकऱ्यांनी त्यांच्या सत्कार देखील केला. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करणारे अमोल बुधवंत सर यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो.
– श्रेयस पारटवाड, विद्यार्थी
*शिक्षकांनी व शिक्षणप्रेमी यांनी केले नियोजन 😘
संकल्प फाउंडेशन यांनी केलेले शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य प्रबोधन, स्वच्छ्ता अभियान याचे नियोजन शिक्षणप्रेमी श्री. प्रकाश सुर्यवंशी, श्री. घाग साहेब व जिल्हा परिषद शाळा भावेचे मुख्याध्यापक अनिल चीनके, सुरेश कवडे, शिक्षक अमोल बुधवंत, नागनाथ सरक यांनी केले. तसेच पारटवाड सर, मेंगडे सर, सुधीर सरक आदी यांनी मदत केली.
























