Our Activities
सन्मान कर्तृत्ववान सावलीचा
“प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण सर्वजणी आहात. . “
आपल्या यजमानांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहिलात. त्यांच्या यशा बरोबर अपयशातही ती सहभागी झालात. त्यांची सुखदुःख आपली मानून अडीअडचणीत पाठबळ आणि प्रोत्साहन दिले. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आपल्या कर्तुत्ववान पतीची तुम्ही खऱ्या अर्थाने ‘सावली’ बनलात. कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारी तुम्ही हिरकणी आहात. तुम्ही स्वतःलाही सिद्ध केले आहे. आपल्या क्षेत्रातही एक छाप पाडली आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान कर्तुत्वान सावलीचा’ या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सर्वजणी आलात व तुमचा सन्मानित करताना अतिशय आनंद झाला . अशीच साथ नेहमी राहो हीच सदिच्छा🙏🙏
विशेष आभार लायन गुप चे अध्यक्ष श्री बाळू शेठ फडके , अमर दादा व माजी नगरसेविका सौ निता माळी यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल धन्यवाद




























